कल्याण – आहिल्यानगर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

1 min read

बेल्हे दि.२३:- कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे सोमवार दि.२२ रोजी सायंकाळी अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती.बेल्हे ते राजुरी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावरती सिमेंट काँक्रीटचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. बेल्हे ते आळे या ९ किमी अंतरावर या महामार्गावर गेल्या चार ते पाच महिन्यापासून काम सुरू आहे. हे काम सावकास सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागत आहे. कल्याण ते अहिल्यानगर महामार्गावर बेल्हे ते आळेफाटा यामध्ये प्रचंड वाहतूक संख्या वाढली आहे. रांजणगाव एमआयडीसी, शिरूरला जाणाऱ्या मालवाहतूक गाड्या या रस्त्याने जा ये करत असतात. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. सोमवार दि.२२ रोजी दुपारी गुंजाळवाडी येथे याच रस्त्यावर ईरटीका व छोटा हत्तीचा अपघात झाला.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. काम चालू असल्याने वाहतुकीसाठीच्या रुंद रस्त्यामुळे वाहन चालकांचे वारंवार वाद होत आहेत.

——
प्रतिक्रिया

‘सोमवारी दुपारी दोन वाहनांचा अपघात झाला. सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. ३ ते ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्याचे काम जलद पूर्ण करावे.’

रामा गुंजाळ
सामाजिक कार्यकर्ते गुंजाळवाडी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!