बोगस बियाणे विकणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा:-कृषी मंत्री अब्दुल सत्तार

1 min read

पुणे दि.११:- शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी बोगस बियाणे विकणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.पेरणीच्या – हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत असतात.त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.अब्दुल सत्तार म्हणाले, ज्यांच्याकडे बोगस बियाणे, औषधे किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी थांबवण्यासाठी आत्महत्या दिवस उपक्रमरा बवला. ज्यात राज्यातील १६ हजार शासकीय कर्मचारी- अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा अभ्यास केला.महिन्यांसाठी विशेष पथक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे घेऊन जाणार आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे दोन महिन्यांसाठी विशेष पथक तयार करण्यात आला पाहिजे.

यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील. मी कृषीमंत्री किती दिवस राहिल माहित नाही. पण मंत्री असून देखील आपण काहीच केले नाहीतर शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, असेही सत्तार म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे