देवीच्यामुर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्यात;मूर्तीच्या दरात वाढ

1 min read

बेल्हे दि.२०:- नवरात्र उत्सवाची चाहुल लागल्याने देवीच्यामुर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.
नवरात्र उत्सव काही दिवसांवर येउन ठेपला असुन त्याचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहेत.गणपती उत्सव संपल्यानंतर १५ दिवसांतच नवरात्र उत्सवाला उत्साहाने सुरुवात होते. देवीच्या मुर्तीवर अखेरचा हात कारगीर फिरवत आहेत. प्लास्टर ऑफ पँरिसच्या दरात तसेच इतर साहित्यांमध्ये ३० टक्के वाढ झाल्यामुळे देवींच्या मुर्तींच्या किंमतीतही वाढ झाली असल्याची माहिती कारखानदार सिध्दार्थ विश्वासराव यांनी दिली.अगदी मुर्ती २ फुटापासुन ते ४ फुटांपर्यंत विक्रीला असुन त्यांच्या किंमती २ हजार रुपयांपासून ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत.त्यांना घरातील सर्वच लोकांची मदत होत आहे.सर्वत्र नवरात्र उत्सवाच्या काळात मंडळांच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.त्याचे नियोजन मंडळाचे कार्यकर्ते आत्तापासुनच करण्यात मग्न आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!