जुन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी; बेल्हे, निमगाव सावा केंद्रात कमी पर्जन्य
1 min read
जुन्नर दि.२०:- जुन्नर तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात आत्तापर्यंत पाऊस झालेला आहे. आदिवासी भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर मध्यपूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.
या वर्षीच्या पावसाळी हंगामात गेल्या १११ दिवसात समाधानकारक पाऊस झालेला असून तालुक्याची सरासरी पाऊस ७५० मिमी इतका असताना आत्तापर्यंत ७९५ मिमी इतका पाऊस झालेला आहे.जुन्नर तालुक्यातील ९ पर्जन्यमापक केंद्रांवर १ जून पासून आत्तापर्यंत झालेला पाऊस तर मागील वर्षी याच कालावधीत झालेला पाऊस पुढील प्रमाणे मिमीमध्ये :-
निमगाव सावा २३१/४१०, बेल्हे- २०२/ ३८९, मढ- १३९७/ १७५९, आपटाळे-१२९४/ १३२०, आजनावळे-२७५८/३२७४, जुन्नर- ५२७/६६८, नारायणगाव ४०३/४९३, ओतूर- २१३ /४०१, वडगाव आनंद १३५/२७१
