गुळुंचवाडीतील पुलाची रुंदी वाढवा:- पांडुरंग पवार

1 min read

बेल्हे दि.१८:- कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर असणाऱ्या गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील अरुंद पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुळुंचवाडी गावातुन आपला राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ मुंबई विशाखापटटणम हा महत्वाचा रस्ता जातो. सध्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रेट चे काम चालू आहे. गावालगत ओढयाच्या पुलाच्या पुर्वकडे गावची स्मशानभुमी व पश्चिमेकडे श्री मळगंगा मातेचे मंदीर आहे. शुक्रवार दि.१९/७/२०२४ रोजी दशक्रिया विधी संपवुन सकाळी ९ वाजता लोक घरी जात असताना एका मालवाहू ट्रकने लोकांना चिरडले. त्यात पाच लोकांचा जागीच मृत्यु झाला व काही लोक जखमी झाले. त्यावेळी या अपघाताची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी एकत्र येऊन यावर कायम स्वरुपी काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा झाली. पण यातुन काहीच निर्णय झाला नाही असे दिसते. या गावालगतच्या ओढयावरील पुलाची पश्चिम बाजुने रुंदी वाढविल्यास (अंदाजे ४ मीटर) दळणवळण सोयीस्कर होऊ न भविष्यकाळात असे अपघात टाळता येतील तसेच आणे घाटापासुन गुळुंचवाडीच्या दिशेने रस्त्याची रुंदी दोन्ही बाजुने प्रत्येकी ३ मीटर वाढविणे गरजेचे आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश सबंधितांना दयावेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!