“विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या बाह्य सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट दर्जा प्राप्त”
1 min read
आळेफाटा दि.१७:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे या महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत नेमणूक केलेल्या देखरेख पथकामार्फत सदर सर्वेक्षण करण्यात आले. देखरेख पथकाने महाविद्यालयास भेट दिली.
त्यावेळी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सर्व पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयाचा निकाल, अनुभवी शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.
या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयास उत्कृष्ट दर्जा प्रदान केला.महाविद्यालयातील रुग्ण समुपदेशन, पालक सभा, औद्योगिक भेट, शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस, आणि नोकरीसाठीचे नामांकित कंपन्यांचे मेळावे
अशा अनेक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, संशोधन व नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे हेच महाविद्यालयाचे भावी ध्येय आहे.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व विश्वस्त, सीईओ डॉ. डी. डी. गायकवाड, प्राचार्य डॉ.आर.ए. हांडे सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांचे मोठे योगदान आहे.
