अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या; निलेश लंकेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1 min read
अहिल्यानगर दि.१६:- जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून
त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कपाशी, सोयाबीन, उडीद, बाजरी तसेच भाजीपाला यांसारखी सर्व हंगामी पिके अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.
या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे खासदार लंके यांनी मागणी केली आहे की, शेतकऱ्यांना व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, पूरसदृश व धोकादायक ठिकाणी आवश्यक त्या यंत्रणांची तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
