आणे विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना ९ टक्के लाभांश
1 min read
आणे दि.१५:- श्रीरंगदास स्वामी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणे (ता.जुन्नर) ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.१४) संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पठारावरील आणे, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी या महसुली गावांची साठी ही महत्वाची सोसायटी आहे.
सोसायटी चे चेअरमन डॉ. दिपक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पठारावरील शेतकऱ्यांना पिकांवर कीटकनाशकांची फवारणी सुलभ व्हावी यासाठी संस्थेच्या मालकीचा ड्रोन खरेदी करण्यात यावा. असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
या सभेत सर्व सभासदांना ९ टक्के लाभांश वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.सभासदांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच वेळेवरती कर्ज भरून कर्ज भरण्याच्या सवलतीचाही लाभ घ्यावा. असे आवाहन चेअरमन डॉ. दीपक आहेर यांनी या वेळी बोलताना केले.
या सभेत प्रकाश दाते, अजित शिंदे, अमोल शिंदे, मधुकर दाते, अनंथा आहेर, ज्ञानेश्वर संभेराव, गोविंद भोसले, भागवत शिंदे आधी सभासदांनी चर्चेत सहभाग घेऊन आपआपली मते मांडली.
या सभेसाठी सोसायटीच्या व्हा. चेअरमन देवूबाई बेलकर, माजी चेअरमन बाळासाहेब दाते, रखमा दाते, शंकर आहेर व सर्व संचालक तसेच आणे, आनंदवाडी, शिंदेवाडी व पेमदरा येथील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
