महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (सेट )परीक्षेत अर्चना आचार्य -पांडे यांचे घवघवीत यश
1 min read
पिंपळगाव दि.१६:- पिंपळगाव ता. आंबेगाव येथील श्रीराम विद्यालयाच्या शिक्षिका अर्चना संतोष आचार्य -पांडे या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या.महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा हि विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ आयोगामार्फत घेतली जाते. हि परीक्षा ३२ विषयांची आयोजित करण्यात आली होती.
सेट परीक्षेचा निकाल लागला असून तो ६. ६९ इतका आहे. परीक्षेत बसलेल्या ९० हजार विद्यार्थीपैकी ६०५० विध्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत.या परीक्षेमधे श्रीराम विद्यालयातील उपशिक्षिका अर्चना आचार्य या चांगल्या गुणांसह पात्र झाल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डी. पी. फापाळे, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती,
तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे बाळासाहेब शिरतर, संदीप शितोळे, बेल्हे ग्रा. पं सदस्य नवनाथ शिरतर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम वायदंडे, रामदास साळवे, प्रथमेश साळवे, शंकर शिंदे गुरुजी, दिगंबर भारती, रमेश घनदाट,
रविंद्र आचार्य, भरत शिंदे, एकनाथ शिंदे, जालिंदर गाजे, संतोष शितोळे, शशिकांत गायकवाड, सचिन शिरतर, बारकू शितोळे, सुधीर येलमर,संतोष घनदाट, ऋषिकेश दिवेकर, सागर भालेराव आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
