मंगरूळ पारगावची समृद्धी येवले उंच उडी स्पर्धेत जुन्नर तालुक्यात पहिली

1 min read

बेल्हे दि.१५:- महात्मा गांधी हायस्कूल पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी समृद्धी राजाराम येवले हिने आपल्या कठोर सराव, मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर जुन्नर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उंच उडी (१४ वर्षे वयोगट) या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तालुका पातळीवरील हा विजय म्हणजे समृद्धीच्या प्रवासाची सुरुवात आहे. आता समृद्धीचे लक्ष जिल्हास्तरीय स्पर्धेकडे असून राज्यस्तरावर कौशल्य दाखविण्याचा तिने निश्चय केला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. डॉ. नवले व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे. समृद्धी हिचे श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणेचे अध्यक्ष, श्रीप्रकाश बोरा तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. डॉ. नवले,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शंकर भोर, सरपंच,उपसरपंच, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ पारगाव यांनी समृद्धीचे तसेच क्रीडा शिक्षक व विद्यालयाचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!