यादववाडीत रस्त्याला भगदाड; दुरुस्तीची मागणी

1 min read

बेल्हे दि.१५:- बेल्हे ते बोरी या रस्त्यावरील यादव वाडी जवळ असणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेऊन दुर्घटना घडण्याच्या अगोदर पुलाला पडलेले भगदाड तातडीने बुजविणे गरजेचे आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथून बोरी मार्गे नारायणगावला जाणारा जवळचा व टोल वाचविणाऱ्या महत्त्वपूर्ण असणार्‍या रस्त्यावरील या पुलावरुन शाळकारी विध्यार्थी, गवळी, दुचाकी, चारचाकी यांच्यासह मालवाहतूक वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते.यादववाडी येथील मच्छिंद्र लामखडे यांनी सदर खड्ड्यांमध्ये दुचाकी, चारचाकी या गाड्या त्या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ नये म्हणून, सुरक्षिततेसाठी झाडाच्या फांद्या व त्याच्या बाजूला दगड ठेवले आहेत.तसेच या पुलाला संरक्षक कठडेही नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सार्वजनिक विभागाने तात्काळ पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करावे अशी मागणी यादववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र लामखडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!