प्रसिद्ध किराणा मालाचे व्यापारी रमेशलाल बन्सीलाल भंडारी यांचं निधन; बेल्हे व परिसरात हळहळ
1 min read
बेल्हे १५:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील किराणा मालाचे व्यापारी व भंडारी परीवारातील रमेश भंडारी त्यांच्या पत्नी व मित्रपरीवारासह सहलीसाठी राजस्थान येथील खाटूशाम या ठिकाणी गेले असताना, शनिवारी रात्री १ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्या सोबत असलेल्या मित्र परीवाराने तेथील रुग्णालयामध्ये दाखल केले.
डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रमेश भंडारी हे अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे चुलते होत. बेल्हे ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांचे सासरे तर स्वप्निल व संकेत भंडारी यांचे वडील होत. यांच्या मृत्यूने बेल्हे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
