व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा

1 min read

वडगाव कांदळी दि.१४:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदी दिवस (१४ सितंबर) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या शुभहस्ते, समन्वयिका व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मंगलमय सरस्वती वंदनेने करण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी ईश्वरी घाडगे व प्रणिती आहेर यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले. त्यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व व हिंदी भाषेचे राष्ट्रभाषा म्हणून असणारे स्थान उपस्थितांसमोर प्रभावीपणे स्पष्ट केले.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाकौशल्यातून हिंदीप्रेम व्यक्त केले. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी वृंदा गणिगा हिने हिंदी भाषेतील सुंदर कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी स्वरा डोमाळे हिने आपल्या प्रभावी भाषणातून हिंदी भाषेचे महत्व अधोरेखित केले. शाळेमध्ये सर्वत्र हिंदी विषय शिक्षकांनी हिंदी दिवसाचे महत्त्व दर्शवणारे आकर्षक फलक देखील लावले होते. यामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण हिंदीमय व संस्कृतिमय झाले होते.या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल आदरभाव, अभिमान व राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव जागवली गेली.कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेतून कार्यक्रम अधिक यशस्वी व संस्मरणीय ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!