मॉडर्नची हेमाली दळवी जुन्नर तालुक्यात पहिली

1 min read

बेल्हे दि.१४:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना त्यांच्या वतीने नारायणगाव येथील रा.प.सबनीस विद्यालयात घेण्यात आलेल्या मुलींच्या जुन्नर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे च्या दहावीच्या हेमाली प्रकाश दळवी हिने १७ वर्ष वयोगटातून १०० मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. ४ ऑक्टोंबर रोजी बालेवाडी पुणेयेथे होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच १७ वर्षे मुली २/१०० मीटर रिले व ४/४०० या प्रकारामध्ये शाळेच्या विद्यार्थिनी तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. हेमाली प्रकाश दळवी, श्रेया अनंत खुटाळ, प्रेरणा विनोद घुंटे, अंकिता दीपक दळवी, कुलती सुभाष वढाण या पाच खेळाडूंनी रिले मध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश शिंदे व आदेश हाडवळे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे,विश्वस्त दावला कणसे,प्राचार्या विद्या गाडगे,उपप्राचार्य के.पी.सिंह व सर्व शिक्षक,पालक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!