मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; नागरिकांना आता सरकारी सेवा अन् योजना व्हॉट्अपवर मिळणार

1 min read

मुंबई दि.१२:- आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण डिजिटाइज पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते, त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे, डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारकडील रेकॉर्ड वरुनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे, आपले सरकारचं हे दुसरं व्हर्जन येत आहे. त्यामध्ये, 4 टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे? हेही पाहाता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडेक्टिबल होणार, व्हॉट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील, असेच दिसून येत आहे.महाराष्ट्रातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे, ती पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत.त्यामुळे, आज याचा आनंद वाटतो आहे, ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळेल. डेटा सैंटरची उभारणी रायगडमध्ये होईल, नाशिकमध्ये नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळेल. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहोत. तिथे 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहोत. अदानींची देखील 70 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे, असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!