नळवणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

1 min read

नळवणे दि.५:- डिसेंट फाउंडेशन, पुणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुणे, ग्रामपंचायत नळवणे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नळवणे व बहुजन विचार मंच आणे यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीगणेशा आरोग्याचा“ या आरोग्यदायी उपक्रमांतर्गत शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठल रुख्मिणी मंदीर नळवणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरात हृदयरोग, मूत्ररोग, कॅन्सरपूर्व तपासणी, हाडांचे आजार, स्त्रीरोग ,त्वचारोग तपासणी तसेच बी.पी., शुगर व रक्तातील विविध तपासण्या अशा अनेक तपासण्या व उपचार प्रख्यात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत करण्यात आले. श्री हॉस्पिटल, आळेफाटा, डोके हॉस्पिटल नारायणगाव,आळेफाटा हॉस्पिटल,भीमाशंकर हॉस्पिटल,वलव्हनकर क्लिनिक,ओतूर, प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे आणि हिंद लॅब जुन्नर यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.याशिवाय शिबिरात ३७ ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यमान वय वंदना ओळखपत्र नावनोंदणी करण्यात आली. तसेच ४० वयोवृद्ध आजी-आजोबांना आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात आले.तसेच नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि दिव्यांगांसाठी आवश्यक कृत्रिम साहित्य वाटप पूर्व नावनोंदणी करण्यात आली.शेकडो नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.यावेळी डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई ,ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे,संचालक आदिनाथ चव्हाण, निलेश कणसे, सरपंच अर्चना उबाळे , दीपक चव्हाण, अतुल गोफने, अरविंद पंडीत, डॉ.रचना घोडे,डॉ.विशाल घोडे,शिबीर समन्वयक कृष्णा रोकडे, कैलास लासुर्वे, डॉ गणेश शेलार, डॉ.अश्विनी शेलार, डॉ.अवदूत वलव्हणकर, डॉ.अदिती वलव्हणकर, प्रयोगशाळा समन्वयक अजय वाळुंज,तपासणी तज्ञ सपना बेलवटे,आरोग्य मित्र दीपाली जोरी, स्नेहा अल्हाट,प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे सर्व आरोग्य सेवक, आशा सेविका तसेच पंकज कणसे, कल्पना वैभव काळे सरपंच साळवाडी, जयश्री गाडेकर सरपंच पेमदरा आणि नळवणे गावातील विविध संस्थेतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!