ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही
1 min read
मुंबई दि.५:- सप्टेंबर व ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देण्यात येणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान, जर कोणी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
या महिलांना योजनेअंतर्गत यापुढे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत २६ लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे, याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. त्यानंतर या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहे. महिलांच्या घरात लाडकी बहीण योजनेचे किती लाभार्थी आहेत. घरात कोणी टॅक्स तर भरत नाही ना,
महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नाही ना, या सर्व गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतरच महिला पात्र आहेत की अपात्र हे ठरवले जाते. या पडताळणीतून ज्या महिला अपात्र ठरतात त्यांचे अर्ज बाद केले जातात.