पोळेश्वर युवा मंच गणेश मंडळकडून प्राथमिक शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर एक शाळेत पोळेश्वर युवा मंच बेल्हे या गणेश मंडळाकडून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गणपती या विषयावर हस्ताक्षर लेखन केले. यामध्ये प्रत्येक वर्गातील विजयी स्पर्धकांना विजयी स्पर्धकांना मंडळाच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष धनंजय भारती, सदस्य शैलेश नायकोडी, किशोर अभंग, रसिक गांधी अभिजीत बेल्हेकर, इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शाळेमध्ये स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, मुख्याध्यापिका,मिरा बेलकर यांनी सर्वांचा सन्मान केला.शाळेतील सर्व शिक्षकांनी स्पर्धेचे नियोजन केले.उपशिक्षक संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर हरिदास घोडे यांनी सर्वांचे आभार मानले.