भाकरशेठ गाडगे प्रतिष्ठानने जरांगे पाटलांचे केले स्वागत; हजारो मराठा बांधवांना जेवणाची व पाण्याची व्यवस्था
1 min read
राजुरी दि.२९:- भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांच्या माध्यमातून कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर आशिर्वाद लॉन्स राजुरी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे शिवजन्मभूमीत सहर्ष स्वागत करण्यात आले. या वेळी सर्व मराठा क्रांती मोर्चा च्या हजारो बांधवांना स्नेह भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी निमगाव सावा ग्रा.पं. सदस्य, गणेश गाडगे, यात्रा कमिटी अध्यक्ष सोपान गाडगे, सोसायटी चेअरमन, प्रकाश गाडगे, मच्छिंद्र गाडगे, दादामिया पटेल, मयूर काटे, राहुल गाडगे, सूर्यकांत बोऱ्हाडे, लखन गिरी, शंकर गाडगे, भाऊ भुतांबरे, प्रताप जमधाडे, विशाल भुतांबरे, भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठान चे आदी मंडळी जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
