मंचरमध्ये मनोज जरांगे यांच जंगी स्वागत
1 min read
मंचर दि.२९:- एक मराठा लाख मराठा या जयघोषात सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मंचर येथे धुमधडाक्यात गुरुवारी स्वागत करण्यात आले.क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आला तसेच पुष्पवृष्टी करून सर्वच आंदोलकाचे मंचरकर आणि परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शिवनेरी ते मुंबई या दरम्यान जात असताना मंचर येथे मंचर बस स्थानकासमोर आले असता सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले. या वेळी उपस्थित तरुणांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.
इत्यादी घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून मंचरकरांच्या स्वागताला दाद दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेली शेकडो वाहने मंचर बायपास मार्गे गेली.
तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेल्या वाहन चालकांचे आणि सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे नाशिक हम रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये.
म्हणून मंचर पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहने सोडली तसेच मंचर बस स्थानकासमोर गर्दी होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करून वाहन चालकांना दिलासा देण्याचे काम केले.
