शिवजन्मभूमीत; आणे, पेमदरा येथे मनोज जरांगे यांचं पहाटे जोरदार स्वागत

1 min read

आणे दि.२८:- मराठा आरक्षण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे गुरुवार (दि.२८) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यात आगमन झाले. पेमदरा येथे जुन्नर तालुक्यातील बांधवांनी जोरदार स्वागत केले. तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके,माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, माऊली खंडागळे, उद्योजक पंकज कणसे, संतोष खैरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते,उपसरपंच सुहास आहेर, डॉ.दीपक आहेर, आनंदा बेलकर,संतोष आहेर, आदेश बेलकर, बाजीराव भोसले, किसन भोसले, रंगनाथ बेलकर, सुनिल दाते, नवनाथ दाते, वैभव आहेर, सखाराम बेलकर, सभांजी बेलकर, झांबर भोसले, संभाजी भोसले, बाबाजी भोसले, संजय दाते, प्रभाकर दाते, तान्हाजी गुंजाळ, अनिल दाते, विजय दाते, संतोष बेलकर, संतोष वाव्हळ, कुंडलीक बेलकर, हभप शिवाजी महाराज भोसले, भाऊ दाते, प्रकाश बेलकर, सिताराम बेलकर, शिवाजी बेलकर, दिलीप बेलकर, संदिप बेलकर यांसह शेकडो जुन्नरकर तिथे आगमनासाठी उपस्थित होते.त्यानंतर गुळुंचवाडी, बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी, आळे, आळेफाटा, वडगाव आनंद येथे जुन्नरकरांनी जोरदार स्वागत केले. पाच वाजण्याच्या समोरास आळेफाटा (ता जुन्नर) येथे आगमन झाले. फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषणात त्यांचे येथे भव्य असे स्वागत करण्यात आले.आळे, संतवाडी, कोळवाडी, ग्रामस्थांच्या वतीने आळेफाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. एकूण ४० जेसीबीतून त्यांच्यावरती फुलांची उधळण करण्यात आली. आळेफाटा चौकातील एक मराठा लाख मराठा या व इतर घोषणांनी आळेफाटा परिसर पहाटेच्या सुमारास दणाणून गेला होता.आळेफाटा चौकात थांबल्यानंतर त्यांनी उपस्थित सर्वांना अभिवादन केले आणि चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पगुच्छ केली. अगदी रात्रभर येथे सर्व समाज बांधव जागे होते. जागोजागी जुन्नरकरांनी बांधवांना पाणी, बिस्किट, दुध, नाष्टा,जेवण,झोपण्याची व्यवस्था केली होती. आळेफाटा नंतर वडगाव आनंद येथेही मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आळेफाटा पोलिस ठाण्याचे वतीने हद्दीतील पोलिसांनी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!