जामखेड तालुक्यात दहशत माजवून खुनाचा प्रयत्न करणारे पाच जण पोलिसांच्या ताब्यात

1 min read

जामखेड दि.२८:-जामखेड तालुक्यात दहशत माजवून खुनाचा प्रयत्न करणारे पाच संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वैभव विजय साबळे (वय २९), कल्याण पांडुरंग मोहोळकर (वय.२८), अभयसिंह किसन राजेभोसले (वय.२३), नरेंद्र शहाजी सोनवणे (वय. २३), साईनाथ संपत राजपूत (वय २१, सर्व रा. नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यात खुनाचा प्रयत्न करणारे संशयित आरोपी हे राजुरी (ता. जामखेड) येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, प्रकाश मांडके, अमोल आजबे, महादेव भांड यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!