जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी चैतन्य विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड

1 min read

ओतूर दि. २८ – जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दि. २५ ऑगस्ट रोजी जुन्नर या ठिकाणी संपन्न झाल्या.या स्पर्धेत ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयाच्या ५ खेळाडूंनी यश मिळवून या खेळाडूंची एच. डी. इंग्लिश मिडीयम स्कूल, हवेली या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.यशस्वी खेळाडू खालील प्रमाणे:-
१) सुप्रभा बाळासाहेब साबळे (१४ वर्षे वयोगट मुली ),२)ओम बाळासाहेब आरोटे व ३) चैतन्य काशिनाथ वायकर (१७ वर्षे वयोगटातील मुले ),४) संस्कृती दिपक अहिनवे (१७वर्षे वयोगटातील मुली ),५) यज्ञेश शांताराम घोलप (१९वर्षे वयोगटातील मुले ).या यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख अमित झरेकर, विजया गडगे , देवचंद नेहे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे अजित डांगे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!