वैष्णो देवी यात्रा मार्गावर दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी
1 min read
श्रीनगर दि.२७:- जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील स्थिती खराब झाली आहे. कटरा येथील वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर बुधवारी (२७ ऑगस्ट) दरड कोसळली असून या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच २३ जण जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणांवरून दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. मातीच्या ढिगाऱ्यांमुळे, मोठमोठे दगड कोसळल्यामुळे जम्मू-कटरा महामार्ग बंद झाला आहे. यासह इतरही काही छोटे रस्ते बंद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून काम सुरू आहे. अद्यापही रेस्क्यू काम पूर्ण झालेलं नाही. ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जणं अडकल्याची भीती आहे.
कटरा शहरापासून टेकडीवर असलेल्या मंदिरापर्यंतच्या 12 किमीच्या वळणाच्या मार्गाच्या मध्यभागी भूस्खलन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. वैष्णो देवी मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. हिमकोटी मार्गावर सकाळपासून यात्रा स्थगित करण्यात आली होती.
मात्र जुन्या रस्त्यावर रात्री 1.30 वाजेपर्यंत यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांनी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.भारतीय वायुसैन्याचं एक सी-130 विमान बुधवारी मदतीसाठी जम्मूला पोहोचलं आहे. वैष्णो देवी मार्गावर झालेल्या भूस्खलनादरम्यान अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी भारतीय वायुसैन्याचं विमान पोहोचलं आहे.
राहत और बचाव सामग्री लेकर भारतीय वायुसेना का एक सी-130 परिवहन विमान बुधवार को माता वैष्णो देवी तीर्थस्थल मार्ग पर अर्धकुंवारी के पास हुए भूस्खलन से प्रभावित लोगों को सहायता प्रदान करने के लिए जम्मू पहुंच गया. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) साहित्य घेऊन जाणारे
सी१३० वाहतूक विमान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावरून उड्डाण घेऊन जम्मूला पोहोचले. याशिवाय जम्मू, उधमपूर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळांवर चिनूक आणि एमआय-१७ व्ही५ सारखी हेलिकॉप्टर स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्धकुमवारीजवळील वैष्णोदेवी मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाले होते. तिथे बचावकार्य सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात बुधवारी चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरग्रस्त सखल भागातून हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले.
