कल्याण – अहिल्यानगर महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे काम एक महिन्यापासून बंद; वाहनधारकांची तारेवरची कसरत

1 min read

बेल्हे दि.२७:- कल्याण – अहिल्यानगर महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट चे काम एक महिन्यापासून बंद स्थितीमध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये व वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून येत असून वाहन चालकांना या महामार्गाने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर काम त्वरित चालू करण्याची मागणी स्थानिकांनी तसेच वाहनधारकांनी केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कल्याण- अहिल्यानगर महामार्गाचे काम ओतूर ते आळेफाटा दरम्यान पूर्ण झाले आहे. सध्या आळे ते बेल्हे दरम्यान सुरू असलेले काम गेल्या एक महिन्यापासून बंद स्थितीमध्ये आहे. त्यामुळे या महामार्गावर सतत ट्रॅफिक जाम होत आहे. रस्त्याच्या या महामार्गाचे काम आळे ते गुंजाळवाडी पर्यंत जवळपास झाले आहे. गुंजाळवाडी पासून बेल्हे पर्यंत हे काम गेल्या एक महिन्यापासून बंद स्थितीमध्ये आहे. काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. त्यामुळे एक बाजूचा डांबरी रस्ता उकरल्याने येथे गाडी व्हायबल होऊन दुचाकी स्वारांचे वारंवार अपघात होत आहेत. दुसऱ्या बाजूचे सिमेंटचे काम काही ठिकाणी झाले आहे तर काही ठिकाणी अपूर्ण आहे. अरुंद रस्ता असल्याने वाहनांना ये जा करण्यास मोठा अडथळा होत आहे. दोन मोठ्या वाहनांना वाहन क्रॉस करण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये वाद होत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. या ठिकाणी काही भागात साईट पट्ट्या भरल्यात परंतु काही ठिकाणी माती मिश्रित मुरूम असल्यामुळे या साईट पट्ट्या सुद्धा खचल्या जात आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे ही वाहने खड्ड्यात जात आहेत. बेल्हे ते आळेफाटा दरम्यान या मार्गाने मोठी वाहतूक कोंडी असते. रांजणगाव एमआयडीसीला दिवसभरात हजारो वाहने या महामार्गावरून जातात.मनोज जरांगे पाटलांची रॅली या मार्गाने जाणार असल्याने महामार्ग प्रशासन दोन दिवसांपूर्वी खडबडून जागे झाले. सिमेंट काँक्रेट झालेला एक बाजूचा रस्ता सध्या तातडीने खुल्या करून दिला आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया

“मशीन खराब झाल्यामुळे सध्या एक महिन्यापासून काम बंद होते. साईड पट्ट्याला खड्डे पडलेले भरून घेतले जातील. दोन दिवसात दोन-तीन दिवसात काम सुरू करू.

चेतन भोसले, सेफ्टी इंजिनियर कल्याण- अहिल्यानगर महामार्ग

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!