ज्ञानराज पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर; संस्थेला ३० लाख रुपये नफा
1 min read
आळे दि.२६:- आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या प्रसंगी संस्थेच्या वतीने सभासदांना १२ टक्के लाभांश व दिपावली भेट वस्तु देण्यात येणार असुन संस्थेच्या ठेवी २९ कोटी आहेत.
तर गुंतवणूक १३ कोटी ६० लाख व खेळते भाग भांडवल ३८ कोटी आहेत व नफा ३० लाख रुपयांचा झाला आहे. आणि संस्थेचा ऑडीट वर्ग “अ” आहे . संस्थेमध्ये विज बिल स्विकृती केंद्र, सोनेतारण कर्ज सुविधा,सभासदांचा अपघात विमा १ लाख रुपयांचा आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत सोनवणे यांनी केले.
तर प्रास्ताविक संस्थेचे मा. अध्यक्ष सुधीर वाव्हळ यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक रामदास वाव्हळ, माजी अध्यक्ष नेताजी डोके, संस्थेचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे, संस्थेचे उपाध्यक्ष समीर टकले, सचिव जावेद मोमीन, सहसचिव गणेश शिंदे,
खजिनदार राजेंद्र वनारसे, अं. हि.तपासनिस संतोष राहिंज, विठ्ठल जाधव, समीर आतार ,अमित राहिंज, इम्रान मनियार, सचीन लाड, सुरेश वाव्हळ, सुप्रिया शिरतर, सुनिता भालेराव व्यवस्थापक लक्ष्मण औटी आदी मान्यवर सभासद, सल्लागार उपस्थित होते.
