पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वळसे पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर

1 min read

निमगाव सावा दि.२६:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शरद सहकारी बँकेचे संचालक, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग पवार यांचा 67 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले.या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये पाककला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.तसेच बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयात केलेले आहे. या रक्तदान शिबिरासाठी महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी तसेच गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गावचे सरपंच किशोर घोडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!