प्राध्यापक डॉ.खताळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर
1 min read
ओतूर दि.२६:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ओतूर मधील संगणक विभागप्रमुख डॉ सुनील सुदाम खताळ यांना सांगली येथे शनिवार दि.२३ रोजी ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२५ हा खासदार
विशालदादा पाटील आणि आमदार नायकवडी तसेच माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून डॉ खताळ यांची साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली असून ते कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
प्राध्यापक डॉ खताळ हे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ओतूर येथे गेले बारा वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे संगणक अभियांत्रिकी विभागात बहुमूल्य योगदान आहे त्यांनी तांत्रिक शिक्षण नवसंशोधन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले.
त्यांचे अनेक शोधनिबंध तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तके देखील आहेत.त्यांच्या कार्याची व्याप्ती ही शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन सामाजिक भाव ठेवणारी आहे.या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार डॉ खताळ यांना प्रदान करण्यात आला.असे म्हणतात”पुरस्काराने प्रेरणा मिळते.
आणि प्रेरणेने राष्ट्र घडते” याप्रमाणे आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी बोलून अभिनंदन केले.
साहित्यरत्न पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, मानद सचिव, वैभव तांबे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
