कौतुकास्पद! नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे विभागात प्रथम

1 min read

नारायणगाव दि.२३:- महाराष्ट्र शासनातर्फे राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरांवरील एकूण बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयांमध्ये शंभर दिवसांची ‘कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम’ राबविण्यात आली होती, त्यामध्ये विविध विषयांनुसार गुणांकन देण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधून नारायणगाव पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक पटकावला आहे.नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील,सोमशेखर शेटे व सर्व कर्मचारी वर्गाने घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आज झालेल्या एका विशेष समारंभातउपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडावार, जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!