जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा डंका

1 min read

वडगाव कांदळी दि.२३:- समर्थ गुरुकुल, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धा नुकत्याच बेल्हे येथे पार पडल्या. या स्पर्धेत विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.विजयी विद्यार्थ्यांची यादी : शौर्य काकडे (अंडर 14 मुले, वजन गट – 30) – प्रथम क्रमांक,आरोही काकडे (अंडर 14 मुली, वजन गट – 38) – प्रथम क्रमांक,श्रावणी महाले (अंडर 14 मुली, वजन गट – 55) – प्रथम क्रमांक,मनस्वी पाचपुते (अंडर 14 मुली, वजन गट – 34) – द्वितीय क्रमांक,आराध्या चव्हाण (अंडर 14 मुली, वजन गट – 42) – द्वितीय क्रमांक संचिता लांडगे (अंडर 14 मुली, वजन गट – 45) – द्वितीय क्रमांक श्रेया पवार (अंडर 14 मुली, वजन गट – 50) – द्वितीय क्रमांक,तनुषा शेट्टी (अंडर 14 मुली, वजन गट – 34) – सहभागी खेळाडू. या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे खालील विद्यार्थ्यांची पुणे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सन २०२५-२६ साठी निवड झाली आहे –शौर्य काकडे (अंडर 14 मुले, वजन गट – 30),आरोही काकडे (अंडर 14 मुली, वजन गट – 38),श्रावणी महाले (अंडर 14 मुली, वजन गट – 55) या सर्व विद्यार्थ्यांनी शिस्त, जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मानाचे यश मिळवले.कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनीही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले व उत्तम तयारी करून घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्व यशस्वी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना,विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्व विजयी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!