चैतन्य विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांकरता करियर गाईडन्स कार्यक्रम संपन्न

1 min read

ओतूर दि.२३:- येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात संगमनेर येथील विद्या विद्यापीठ, व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि ग्राम विकास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने २७० विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स चे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.यावेळी प्राध्यापक राहुल कुमार मिश्रा यांनी दहावीला शंभर टक्के मार्क कसे मिळतील त्याचबरोबर बारावीनंतरच्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षांबाबत माहिती दिली. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की,”निव्वळ गृहपाठ लिहिणे म्हणजे अभ्यास नाही. ‘रीड मच,थिंक मोर’असा अभ्यास करावा. रिविजन, रायटिंग, स्वयं अध्ययन, तज्ज्ञांची मदत आणि पेपर प्रॅक्टिस यावर विद्यार्थ्यांनी जोर देणे गरजेचे आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ मोटिवेशन, बीलीफ सिस्टम याद्वारे आपण यशापर्यंत जाऊ शकतो. “स्टार्ट अर्ली,फिनिश अर्ली”या उक्तीनुसार वेगळ्या पद्धतीने आपण आपला मुद्दा मांडला पाहिजे. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नोव्हेंबर पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी जनरल अवेअरनेस,जनरल नॉलेज, जनरल स्टडी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. मुझे नही पता की जीत मेरी होगी, पर इतना पता है मुझे कि मै हरुंगा नही, अशी प्रेरणा सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. एम एच टी सी इ टी, नीट, आयआयटी जेईई, इत्यादी परीक्षा बाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी ग्रामव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि विद्या विद्यापीठ संगमनेरचे संस्थापक डॉ. नामदेव गुंजाळ, व्हिजनचे सेंटर हेड प्राध्यापक राहुल कुमार मिश्रा, प्राध्यापक सुनिल पांडव ,प्रभाकर तांबे,पंकज घोलप,अनिल उकिरडे, भगवंत घोडे, बाळासाहेब साबळे,मंगेश तांबे, देवचंद नेहे, अजित डांगे, ईश्वर ढमाले ,अरविंद आंबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले तर अजित डांगे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!