वळसे पाटील महाविद्यालयात प्राध्यापकांची कार्यशाळा संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.२२:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळे, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय पारगाव शिंगवे, सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालय बोरी बु., समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे आणि दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य
विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी मधील शामकांत दौंडकर (सेंटर हेड सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट) यांनी उपस्थित प्राध्यापकांना फॅकल्टी डेव्हलपमेंट संदर्भात मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिले जाणारे कौशल्यपूर्ण शिक्षण यासाठी प्राध्यापकही प्रशिक्षित असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत आणणे आणि त्यासाठी येणाऱ्या समस्या व त्यावरती आवश्यक
उपाययोजना याबाबतचे विचार मंथन या कार्यशाळेमध्ये करण्यात आले. प्रोग्रॅम असिस्टंट ऋतुजा तांबे आणि विक्रम वाडकर यांनी एम. एस. एफ. डी. ए. ही राज्यभर कसे कार्य करते याबाबतची माहिती दिली.त्यांनी उपस्थित सर्व प्राध्यापकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थी हित प्रथम जोपासावे,
विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे आणि यासाठी शैक्षणिक संस्थांनी आग्रही असावे असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ रुस्तुम दराडे आणि प्राचार्य डॉ.नाथा मोकाटे यांनी आपल्या मनोगत मधून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्राध्यापक महाविद्यालय यांना येणाऱ्या समस्या बाबत माहिती दिली.
या कार्यशाळेसाठी डी.जी. वळसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे, डॉ. इनामदार एस. एन.,प्रा.जमीर इनामदार, समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मधील डॉ. रुस्तुम दराडे, डॉ. अश्वमेघा सुर्वे, बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे येथील प्रा. दत्तात्रय चव्हाण, डॉ. अर्चना गुंजाळ,
सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालय बोरी येथील प्रा. गणेश शिंदे, प्रा. राजेश मोरे तसेच दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी केले आणि प्रा. अनिल पडवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
