विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीत माजी सैनिक सुधीर डावखर यांच्या हस्ते ध्वजारोहण
1 min read
साकोरी दि.१६:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी येथे स्वातंत्र्य दिन हा सन्मानपूर्वक व मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या मंगल दिनाची सुरुवात भारतीय लष्कर सेवेत २४ वर्षे सेवा केलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर डावखर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), पी. एम. हायस्कूल चे प्राचार्य रमेश शेवाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ आणि अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर इयत्ता ८ वी व ९ वी या विद्यार्थ्यांनी संचलन केले.
सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रकार सादर केले. या वेळी अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादर केले. अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण अतिशय देशभक्तीमय झाले होते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सुधीर डावखर यांनी मनोगत व्यक्त करत.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून खेड्यातील विद्यार्थ्यांना आर्मी क्षेत्रात असणाऱ्या भविष्यातील संधीबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देशाबद्दल असणाऱ्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडण्यासाठी जागृत असावे असे प्रतिपादन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दीपाली ढवळे यांनी केले.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दोन्ही प्राचार्य आणि विद्यालयाच्या CCA विभागाने केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
