विद्यालयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण; श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

1 min read

रानमळा दि.१६:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा या ठिकाणी भारताचा “७९ वा स्वातंत्र्य दिन” मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. सकाळच्या मंगलमय समयी विद्यालयातून प्रभातफेरीने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. रानमळा व परिसरातील सर्व ग्रामस्थ,मुंबईकर पाहुणे मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाच्या शोभेत आणखीनच भर पडली. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी व आजच्या या प्रचंड स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकून राहावा. या उद्देशाने या वर्षीपासून इ. १० वी च्या परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा पायंडा घालण्यात आला. विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाने विद्यार्थ्यांमधे उत्साह व स्पर्धा तर निर्माण झालीच परंतु ग्रामस्थांनीही विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. आणि यामुळे नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होईल अशी आशा व्यक्त केली.यानंतर जि. प. प्राथ. शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाषणांसह विविध कलागुणांचे सादरीकरण करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. योगायोगने याच दिवशी “संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा महाराज यांची ७५० वी जयंती” असल्या कारणाने पसायदान व वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!