राजुरी येथे सायकल बॅंक उपक्रम यशस्वी;३५ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

1 min read

राजुरी दि.१६:- पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतुन सायकलचा आधार – भविष्याला आकार (सायकल बॅंक ) हा ह्यदयस्पर्शी उपक्रम राजुरी येथे जुन्नर तलुक्याचे गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आल्या. सदर उपक्रमांतर्गत गावातील सुमारे 35 विद्यार्थींनीना सायकलींचे वितरण करण्यात आले. गावातील शालेय गरीब गरजु विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास सुलभता व्हावी त्यांचा प्रवास वेळ वाचावा तसेच शिक्षणात सात्यत रहावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.गावातील विविध पतसंस्था, सोसायटी , दुधसंस्था, सेवाभावी संस्था व दानशुर व्यक्तींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महत्वाचे योगदाने दिले. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असुन शाळेत जाण्यासाठीची अडचण दुर झाली आहे.स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनपुर्वक स्वागत केले. 15 ऑगस्ट 2025 स्वांतत्र्यदिनानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सायकींचे वितरण करण्यात आले, कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपकशेठ आवटे, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउलीशेठ शेळके, ग्रामपंचायत सदस्य, एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत जाधव , शाकिर चौगुले, गौरव घंगाळे, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, बाळासाहेब औटी, कैलास औटी, डी.बी.गटकळ,राजेंद्र औटी, राजाराम हाडवळे, दिलीप घंगाळे , सुभाष औटी, जी.के.औटी. अशोक औटी, मुबारक तांबोळी, जिलानी पटेल, रईस चौगुले, रामदास सरोदे, वल्लभ शेळके, संतोषकुमार औटी, दिपक कणसे, पंकज कणसे, सोपान कदम, सत्यवान बोऱ्हाडे, गोरक्ष हाडवळे , राजेंद्र हाडवळे, विक्रम डूंबरे व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, पत्रकार मित्र, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील शाळेतील शिक्षक व दानशुर व सेवाभावी व्यक्ती यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.के.औटी यांनी केले तर आभार सरपंच प्रिया हाडवळे यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!