ओतूर पोलिस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना आवाहन

1 min read

ओतूर दि.१३:- ओतूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात आले आहे की, आज बुधवार दि. 13/08/2025 रोजी दुपारी ठीक 03:30 वा.चे सुमारास सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्तिक गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर मिटिंगचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मीटिंग मध्ये जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिक्षक सो. मा.धनंजय पाटील व ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.लहू थाटे हे मार्गदर्शन करणार आहेत, तरी ओतूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावे, वाड्यावस्त्या येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि दहीहंडी उत्सवाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी मिटींगला वेळेवर उपस्थित राहावे.

स्थळ: – सांस्कृतिक,क्रीडा संकुलन सभागृह ओतूर;- लहू थाटे सहा.पोलिस निरीक्षक, ओतूर पोलिस स्टेशन

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!