गांजाविक्रीसाठी आलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली अटक; १० किलो गांजा जप्त

1 min read

नारायणगाव दि.११:-गांजाविक्रीसाठी आलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. मुनवर अली सय्यद (वय ४८ रा. कोतूळ, ता. अकोले) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. येथील नारायणगाव-मांजरवाडी रस्त्यावर सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १० किलो २७५ ग्रॅम गांजा व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहायक फौजदार दीपक साबळे, हवालदार संदीप वारे, अक्षय
नवले,राजू मोमीन, नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार मंगेश लोखंडे, फौजदार सोमशेखर शेटे, दडस पाटील, सोमनाथ डोके, सत्यम केळकर हे संशयिताच्या मागावर होते. शनिवारी (दि. ९) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नारायणगाव-मांजरवाडी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुनवर सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्या मोटरसायकलवर बांधलेल्या गोणीची तपासणी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!