राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
1 min read
मुंबई दि.११:- राज्यात पुढील तीन दिवसांत पाऊस कोसळणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील तीन दिवस लातूर, धाराशिव तसेच उद्या सोलापूर, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट,
सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्याच्या उर्वरीत जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुणे व आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यता ढगाळ राहणार आहे.
यादरम्यान अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यात ११ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून
तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते. १२ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेनुसार विजांचा कडकडाट होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. १३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून.
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो. विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.१४ ऑगस्ट रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून.
विदर्भाच बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहेत तर तुरळख ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. १५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.
