शेवग्या शेंगा व त्याच्या पानाची भाजी आरोग्यदायी

1 min read

पुणे दि.१०:- शेवग्याची पाने सकाळी चावून खाल्ल्याने शरीराला चांगला फायदा होतो. काही जण शेवग्याच्या शेवग्यांच्या शेंगा खातात परंतू शेवग्याच्या पानांची देखील चांगली भाजी होते. शेवग्यांच्या या पानांमुळे शरीराला चांगला फायदा होतो. शेवग्यांची पाने नियमित खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते. चला तर पाहूयात शेवग्यांच्या पानामुळे शरीराला नेमके काय-काय फायदे होतात.शेवग्यांच्या पानात विटामिन्स ए,सी,ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्य चांगले रहाते.शेवग्याच्या पानात एंटी ऑक्सीडेंट तत्वांचा खजाना आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच शरीर आजारांचा योग्य प्रकारे सामना करू शकते.शेवग्याची पाने सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण राहाण्यास मदत मिळते. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास सहायक ठरते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनयंत्रणा देखील चांगली रहाते. यामुळे बद्धकोष्ठता देखील दूर रहाते, अन्य पचनासंदर्भातील आजारही दूर होतात.या पानात विटामिन्स ए आणि ईचे प्रमाण जादा असते. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले होते. त्वचेला सुरुकत्या होण्याचे प्रमाण देखील कमी होते.शेवग्याच्या पाने मेटाबॉलिझ्म वाढविण्यास मदत करतात,ज्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. याच्या सेवनामुळे भूक कमी होते. आणि शरीरातील ऊर्जा वाढते.शेवग्यांच्या पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहाते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना ही पाने चघळल्याने फायदा होतो.मानसिक आरोग्यासाठी देखील ही पाने चांगली असतात. यातील तत्वे तणाव आणि चिंता दूर करतात. यातील एंटीऑक्सीडेंट घटकांमुळे शरीरातील फ्रि रेडीकल्सशी लढण्यास मदत करते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करते. अनेक रोगांचा बचाव करते.शेवग्याच्या शेंगाची व पानांची भाजी अनेक जण टाळाटाळ करतात. पण या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच ताटात आवर्जुन ही भाजी घ्याल. मधुमेहासारखे आजार आजकाल खूप सामान्य झाले आहेत. काही जणांना आनुवंशिकतेमुळं मधुमेहाचा आजार जडतो तर चुकीच्या लाइफस्टाइलमुळं डायबेटिजचा धोका वाढतो. मात्र, योग्य पद्धतीचा आहार घेतल्यास या आजारावर मात करता येते. शेवग्याच्या शेंगाही साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते.शेवग्याच्या पानांची भाजी शेवग्याच्या शेंगाबरोबरच त्याच्या पानांचीही भाजी केली जाते. या पानांत अनेक गुणकारी घटक असतात. यात व्हिटॅमिन ए, बी 1, बी2,बी6, सी आणि फोलेटचा समृद्ध स्त्रोत असतो. त्याचबरोबर यात मॅग्नीशियम, कॅल्शियम, झिंक आयर्न आणि फॉस्फोरचा स्त्रोत असतो. काही ठिकाणी मेथीच्या भाजीप्रमाणे शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते. तर, काही ठिकाणी पाने मीठाच्या पाण्यातून उकडवून घेतात. नंतर त्यांची भाजी बनवून चपाती किंवा भातासोबत खाल्ली जाते.शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमुळं लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील चरबी कमी व्हावी यासाठी याच्या पानांचा काढा बनवून पिण्यास सुरुवात करा. यामुळं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. या काढ्यामुळं हाडांना बळकटी येते. कारण त्यात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतात. ज्यामुळं ऑस्टियोपोरोसिसच्या समस्येमुळं आराम मिळतो.

थकवा दूर होतो
तुम्हा मानसिक समस्येने ग्रस्त आहात तर शेवग्याच्या पानांचे सेवन कराच. यामुळं मानसिक समस्येबरोबरच स्मरणशक्तीदेखील सुधारते. तुम्ही शेवग्याच्या पानांचे सुपदेखील बनवू शकता. त्यामुळं थकवा कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.स्मरणशक्ती तल्लख होते
शेवग्या शेंगा व त्याच्या पानाची भाजी लिव्हर आणि किडनी डिटॉक्सीफाइ करण्यात मदत करते. त्यामुळं पोटदुखी, अल्सरसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तणाव, चिंता दूर करण्यासाठी तसंच, थॉयराइड, ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनात वाढ होते. ज्या महिला पहिल्यांदा आई झाल्या आहेत त्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे.शेवग्याच्या फुलांची भाजी
शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे. येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!