चिपळूण पोलिसांना बांधल्या नागालँड व मणिपूरच्या विद्यार्थिनींनी राख्या
1 min read
चिपळूण दि.१०:- चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील छात्रावासात राहणाऱ्या नागालँड व मणिपूर येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने चिपळूण पोलीस ठाण्यात हजेरी लावून पोलिसांना राख्या बांधून सणाचा आनंद वाटला.या विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे,
अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांना राख्या बांधल्या.
यावेळी त्यांनी मराठीतील श्री गणेश आगमन गीतही सादर केली. या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस अधीक्षक बगाटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आणि सांस्कृतिक जडणघडीत त्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
