सतत मोबाईल पाहिल्याने वयाच्या तिशी-पस्तिशीतच जडतील ‘हे’ जीवघेणे विकार
1 min read
पुणे दि.१०:- सतत मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय आता फक्त वेळेचा अपव्यय नाही, तर जीवघेणा आरोग्याचा धोका ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नवीन अभ्यासानुसार, दिवस-रात्र स्क्रोलिंग केल्याने मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड निर्माण होत आहे. यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होणे,
झोप बिघडणे आणि विचारशक्ती मंदावणे असे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. तज्ज्ञ सांगतात की, 30-35 वयातच अनेकांमध्ये मेंदूविकार, स्ट्रोक, मायग्रेन आणि एपिलेप्सीचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढले आहे. 5 वर्षांखालील मुलांचा मेंदू जलदगतीने विकसित होत असतो.
अशा वेळी स्क्रीन टाइम वाढल्यास भाषाविकास, निर्णयक्षमता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यावर थेट परिणाम होतो. मुलांमध्ये चिडचिड, चिंता आणि सामाजिक अलिप्तता वाढताना दिसते. तज्ज्ञांचा सल्ला – मुलांना प्रत्यक्ष खेळ, मैदानातील क्रिया आणि समोरासमोरील संवाद यात सहभागी करून घ्या. मेंदूच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे.
