“हर घर तिरंगा” अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

1 min read

अहिल्यानगर दि.८:-स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात “हर घर तिरंगा” अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले असून १५ ऑगस्ट पर्यंत या कालावधीत तीन टप्प्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. ”हर घर तिरंगा” अभियानांतर्गत प्रत्येक घरावर, तसेच शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी बचत गट, स्थानिक उत्पादक व अधिकृत पुरवठादारांकडून राष्ट्रध्वजांचा पुरवठा करण्यात येणार आहे. ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान विविध शासकीय व निमशासकीय उपक्रम, “तिरंगा मेला”, सांस्कृतिक कार्यक्रम व तिरंगा यात्रांचे आयोजन. तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविणे, “सेल्फी विथ तिरंगा” असे उपक्रम होणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!