ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
1 min read
मुंबई दि.८:- शिवकाळात संबंधीत असलेले महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगं म्हणजेच भीमाशंकर (पुणे), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर), त्र्यंबकेश्वर (नाशिक), औंढा नागनाथ (हिंगोली) आणि परळी वैजनाथ (बीड) आता लवकरच विकसित केली जाणार आहेत.
राज्यातील या पाचही ज्योतिर्लिंगांच्या विकासाची कामे वेळेवर आणि योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी प्रत्येक ठिकाणी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. भीमाशंकरसाठी प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वी. राधा, घृष्णेश्वरसाठी उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बन्सु तेल्लाडा रेड्डी,
त्र्यंबकेश्वरसाठी वित्त विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय, औंढा नागनाथसाठी वित्त विभागाचे सचिव ऋचा बाग्ला आणि परळी वैजनाथसाठी OBC कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब ढुळज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला कामाचा अहवाल देतील.
प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. भीमाशंकरसाठी ₹148.37 कोटी, घृष्णेश्वरसाठी ₹156.63 कोटी, त्र्यंबकेश्वरसाठी ₹275 कोटी, औंढा नागनाथसाठी ₹15.21 कोटी आणि परळी वैजनाथसाठी ₹286.68 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच, धार्मिक विकास प्रकल्पांवर थेट उच्च स्तरावरील अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. यामुळे कामात चांगली पारदर्शकता येईल आणि सर्व कामे दर्जेदार होतील याची खात्री मिळेल.
हे अधिकारी नियमितपणे कामाची प्रगती तपासतील आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा अहवाल देतील,ज्यामुळे विकासकामांना गती मिळेल.
