जुळ्या बहिणींना १० वीच्या परीक्षेत सारखेच टक्के: तालुक्यात चर्चा

1 min read

बेल्हे दि.३ :- नुकताच स्टेट बोर्ड चा दहावीचा निकाल जाहीर झाला असून गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथील दोन जुन्या बहिणींना परीक्षेत सारखेच टक्के मिळाल्याने जुन्नर तालुक्यामध्ये या मुलींची चर्चा होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की गुंजाळ भावना पुंडलिक व गुंजाळ भक्ती पुंडलिक या दोघींनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मद्ये दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल काल लागला असून परीक्षेत दोघींनाही 91.40 टक्के असे सारखेच गुण मिळाले आहेत.

या जुळ्या बहिणींना सारखेच टक्के मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून दोघींच्या टक्केवारीची तालुक्यात चर्चा सुरू आहे. त्या दोघींचे पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडीत झाले तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे (ता. जुन्नर) येथे झाले.

शेतकरी कुटुंबातील या दोघी असून आई शेती करते तर वडील ड्रायव्हिंग चा ही व्यवसाय करतात. दोघींनी खूप अभ्यास करून चांगले गुण संपादन केले असल्याने शिक्षकांनी ही त्यांचे अभिंदन केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे