जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन:-डॉ. पंकज आशिया

1 min read

अहिल्यानगर दि.१:- महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व विविध योजनांची माहिती मिळावी, त्यांचा लाभ घेता यावा, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाबद्दलचा विश्वास वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली.राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून यादरम्यान महसूल विभागाच्या सेवा प्रभावीपणे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण व महसूल विषयक जनजागृती हा सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. शुक्रवार (ता. १)रोजी महसूल दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी महसूल सप्ताहाचा प्रारंभ होईल. कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!