आळ्यात २०० वर्षापूर्वी ची परंपरा कायम

1 min read

आळेफाटा दि.३०:- आळे (ता.जुन्नर) येथे स्वयंभू अकरा फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेढ्याची पाच फणी विलोभनीय मूर्ती असून आळे गाव व पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनी नागपंचमीच्या दिवशी आवर्जून वारूळ व नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. २०० वर्षापूर्वीची परंपरा असून महिलांना खेळण्यासाठी झोके असतात.तसेच महिला पारंपरिक गाण्यावर फेर धरून पारंपरिक नृत्य करतात.या बाबत सविस्तर माहिती अशी की, श्री महावेताळेश्वर छत्र सेवा दरबार आळे (आनंदवाडी) यांचे मार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच नागपंचमीला ग्रामीण भागात लुप्त पावत चालेली झोक्याची परंपरा येथे सुरू आहे. झोके खेळण्यासाठी मुली व महिलांनी मोठी गर्दी केली होती. दूध तसेच नैवद्य ठेऊन वारुळाची व नागदेवतेची महिलांनी एकत्र महापूजा केली. या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे ही स्वयंभू अकरा फुटी उंचीच्या वारुळाभोवती नागवेढ्याची पाच फणी विलोभनीय मूर्ती आहे. या ठिकाणी नाग व वारूळ यांचा दुहेरी संगम असून येथे दर्शन घेण्यासाठी दिवसभर हजारो महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच दरवर्षी हा नागपंचमी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री महावेताळेश्वर छत्रसेवा दरबाराचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात. या उत्सवाची सांगता संध्याकाळी नागदेवतेच्या महाआरतीने झाली. तसेच यावेळी श्री महावेताळेश्वर छत्र सेवा दरबारचे सर्व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!