श्री-राम सामाजिक सेवा पुणेकर-मुंबईकर मंडळ डिंगोरे कडून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

1 min read

डिंगोरे दि.२९:- श्री-राम सामाजिक सेवा पुणेकर-मुंबईकर मंडळ डिंगोरे कडून यांच्या कडून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरे मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळा डिंगोरे तसेच जिल्हा परिषद शाळा आमले शिवार मधील १६० विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष कैलास तुळशीराम सुकाळे यांनी स्वीकारले. मंडळाकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचे काम गेल्या दोन वर्षापासून होत आहे.मंडळाकडून सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे काम मंडळाकडून करण्यात येत आहे. गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रममास उपस्थित होते.श्रीराम सामाजिक सेवा मंडळाचे सचिव- विनोद बबन थापेकर, सदस्य बबन कोंढीभाऊ आमले निलेश लक्ष्मण आमले, शांताराम दशरथ उकिर्डे, अमरशेठ सुरेश उकिर्डे तसेच मा.जिल्हा परिषद सदस्य बबनराव निवृत्ती तांबेसाहेब गावच्या प्रथम नागरिक सरपंच सीमा रमेश सोनवणे, उपसरपंच निलेश लोहोटे, गावचे पोलिस पाटील राजेंद्र लोहोटे शिक्षण नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश आमले, सदस्य, विशाल आमले, नितीन आमले संतोष आमले, एकनाथ आमले केतकी सुकाळे, निलोफर पठाण, ग्रामस्थ वसंत लोहोटे, लक्ष्मण लोहोटे, चंद्रकात लोहोटे, काशीनाथ लोहोटे(माजी सैनिक) एकनाथ आमले, महेश सुकाळे. तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक- संजय माळवे, उपशिक्षक भैरवनाथ कराळे, चंद्रशेखर नलावडे मनिषा गायकर हेही कार्यक्रमास उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शाळेकडून तसेच ग्रामस्थांकडून केलेल्या उपक्रमाबद्दल मंडळातील प्रत्येक सदस्याचे आभार व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!