जडेजा आणि सुंदर च्या झुंजार खेळीने पराभवाची नामुष्की टळली,चौथा सामना अनिर्णीत

1 min read

मँचेस्टर दि.२९:- चौथ्या कसोटी सामन्यात भारतावर यावेळी पराभवाची नामुष्की ओढवली होती. पण भारताने पाचव्या दिवशीही दिमाखदार खेळ केला आणि हा सामना ड्रॉ राखण्यात त्यांना यश आले. या सामन्यात गिलनंतर (१०३) रवींद्र जडेजा (नाबाद १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १००) यांनीही शतक झळकावत इंग्लंडला नामोहरम करून सोडले. भारताने ४ बाद ४२४ अशी धावसंख्या करत आपला डाव घोषित केला. इंग्लंडनेही यावेळी हार मानली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अंतिम सामना 31 जुलैला खेळला जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!