कन्नडसक्ती विरोधात 11 ऑगस्टला मोर्चा, मध्यवर्ती म.ए.समितीच्या बैठकीच्या निर्णय
1 min read
बेळगाव दि.२९:- कर्नाटक सरकारकडून सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 11 रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच येणाऱ्या काळात या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये सीमा भागातील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काल रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे.कन्नड सक्ती विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात अवमान व जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णयही यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे घेण्यात आला.
उच्च न्यायालयाने मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतून कागदपत्रे व माहिती देण्याचा आदेश देऊनही त्याचे अंमलबजावणी केले जात नाही.त्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
