थायलंडमध्ये भर बाजारात अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू; हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

1 min read

बँकॉक दि.२९:- थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली असून यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने स्वतःला संपवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हल्लेखोराने गोळीबार नेमका का केला या कारणांचा पोलीस तपास करत आहेत.पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा हल्लेखोर कोण होता याची माहिती घेतली जात आहे. तसेच या गोळीबाराचा सध्या थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेल्या वादाशी काही संबंध नाही ना याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मृतांमध्ये बाजारात काम करणारे चार सुरक्षा रक्षक, एक महिला आणि हल्लेखोराचा समावेश आहे. या गोळीबारात कोणताही पर्यटक मारला गेला नाही. किंवा जखमी झाला नाही. पोलिस या घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत.थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धाशी या घटनेचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. गोळीबाराच्या दिवशीच थायलंड आणि कंबोडियाचे नेते सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी मलेशियात चर्चा करत होते. बँकॉक हे आशियातील सर्वाधिक भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. बँकॉकमधील ओर तोर कोर मार्केटमध्ये हा गोळीबार झाला. हे मार्केट चाटुचाक मार्केटपासून जवळच आहे. चाटुचाक मार्केट हे थायलंडची राजधानी बँकॉकमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ओर तोर कोर मार्केट उच्च प्रतीची ताजी फळं आणि सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन हा थायलंडमधील एक महत्त्वाचा आर्थिक चालक आहे. पण अशा घटनांमुळे प्रवासी आणि तेथील स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंता वाढत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!